ग्रामपंचायत परडी माटेगाव

आमच्या गावा बद्दल

उद्याच्या प्रगतीकडे वाटचाल करणारे गाव

सामाजिक बांधिलकी, सहभाग आणि सेवा हाच आमच्या कार्याचा पाया आहे.

परडी माटेगाव हे कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले गाव आहेत.माजलगाव धरणाच्या व कुंडलिका नदीच्या पाण्यामुळे गावाला विशेष नैसर्गिक रूप मिळालेलेच आहे.1)गावात सुसज्ज प्रशासन युक्त ग्रामपंचायत कार्यालय आहे. 2)स्मशानभूमी परडी व माटेगाव साठी स्वतंत्र आहेत. 3)पाणीपुरवठा योजना परडी व पाणीपुरवठा योजना माटेगाव अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. 4)जलशुद्धीकरण यंत्र 4 बसवून गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी दिले जाते.5)गावात पक्के सिमेंट रस्ते आहेत. 6)गावात पुर्णपणे भुमिगत नाली आहे.7)सुसज्ज आरोग्य उपकेंद्र आहे.8)दोन अंगणवाडी आहेत.गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, आरोग्य व सामाजिक उपक्रम यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आम्ही कटिबद्ध आहोत.जागृत व प्रसिद्ध देवस्थान माता धानकाई देवी.9)स्मार्ट व शैक्षणिक सुविधांनी युक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.अशी आमच्या गावाची खास ओळख आहे.

आमचे ध्येय

परडी माटेगाव ग्रामपंचायतीचे ध्येय गावाचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करणे हे आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

  • देवगाव

  • खापरवाडी

  • केंडेपिंपरी

ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी

ॲड माधव गंगा शंकरराव शेंडगे

सरपंच

सौ. स्वाती सुरेश शेंडगे

उपसरपंच

श्री. हनुमंत विश्वांभर ईरमले

ग्रामपंचायत अधिकारी

गावाची माहिती

ग्रामपंचायत

परडी माटेगाव

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- 01/01/1962

क्षेत्रफळ

1130 हेक्टर

तालुका

वडवणी

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या (२०११)

1572

पुरुष

813

स्त्री

759

कुटुंब संख्या

360

शेतकरी संख्या

859

मतदारांची संख्या

1260

लागवडी योग्य क्षेत्र

748 हे

स्ट्रीट लाईट पोल

45

अंगणवाडी

02

जिल्हा शाळा

02

पोस्ट ऑफिस

0

तलाठी ऑफिस

01

आरोग्य उपकेंद्र

01

महिला बचत गट

21

नळ कनेक्शन

179

सार्वजनिक विहीर

03

सार्वजनिक बोअर

0

सार्वजनिक आड

0

प्रधानमंत्री घरकुल

139

गावाचा नकाशा

परडी माटेगाव गावाबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

परडी माटेगाव गाव कुठे स्थित आहे?

परडी माटेगाव हे गाव वडवणी तालुक्यात, बीड जिल्हा मध्ये, महाराष्ट्र राज्यात स्थित आहे.

परडी माटेगाव गावाची ग्रामपंचायत हेच पार्डी (माटेगाव) ग्रामपंचायत आहे

परडी माटेगाव गावाचा पिनकोड 431131 आहे.

2011 च्या जनगणनेनुसार,परडी माटेगाव लोकसंख्या 1572 अंदाजे  आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार,  गावामध्ये एकूण 360 घरं आहेत.

Scroll to Top